चांदागड येथील गोंड कालीन स्थापत्य कला

Main Article Content

अशोक नानाजी नैताम, एस. आय. कोरेटी

Abstract

चांदागड म्हणजे आजचे चंद्रपूर होय. या ठिकाणी गोंड घराण्याची सत्ता होती. या घराण्याचा पाया शिरपूर या ठिकाणी इसवी सनाच्या नवव्या शतकात रचला गेला. या घराण्यातील पहिले गोंड राजे भीम बल्लाळसिंह होते. या घराण्याने इ.स. १७५१ पर्यंत राज्य केले. या भूप्रदेशामध्ये स्थापत्यकलेतील विकासात्मक कामे करण्यामध्ये गोंड घराण्याचे मोठे योगदान आहे. गोंड घराण्यांनी मध्य भारतातील चंद्रपूर भूप्रदेशात अनेक मंदिरे, किल्ले व तलाव निर्माण केली. गोंड घराण्याची स्थापत्यकला गोंडी स्थापत्य शैलीतील होती. या घराण्याने दक्षिण व उत्तर भारतातील स्थापत्य कला अभ्यासली होती. या दोन्ही स्थापत्यकलेच्या मिश्रणातून स्वतःची एक नवीन स्थापत्य कला निर्माण करून, ती स्थापत्यकला चांदा भूमीत रुजवली. या स्थापत्य कलेच्या आधारावर चांदागड राज्यामध्ये अनेक ठिकाणी वास्तू निर्माण केल्या. या शोध निबंधाच्या आधारे चांदागड या भागातील स्थापत्य कलेचा अभ्यास करण्यात आला आहे.

Article Details

Issue
Section
Articles